परमेश्वर उध्दरीता
〰〰〰〰〰〰〰〰〰〰जीव सर्वाधिकारी असल्यामुळे तो कोणतेही कर्म अन्यथाज्ञानामुळे तसेच जसजसा संग सांगात मिळेल
त्यानुसार कर्म करुन अयोग्यता जोडून घेत असतो.
त्यातच मतीत्रय संपन्न प्रकृती असल्यामुळे तर जीव नेहमी पापरुप कर्मेच जास्त जोडून घेत असतो. ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते.
तसेच जीवाला असे करण्यास चेष्टवित असलेले
सलग्न चेष्टविण्याचे काम करुन गमंत पहात बसलेले असते.
व या सर्व गोष्टीचा फायदा आपोआपच देवता उठवितात व आपली फळे देतात
अशा प्रकारे प्रपंच्याचा जीवाबरोबर चाललेला खेळ असून तो खेळ नाशिवंत व व्यभिचारी असल्याचे देवता जीवाला ज्ञान होवू देत नाहीत .
परंतु जीव अर्जक असल्यामुळे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या निरुपनात विचार प्रकरण मध्ये म्हणतात की ,
" जीव पाप पुण्य रुप कर्मे जोडणारा आहे . देवता त्या त्या क्रियेची फळदाती आहे.
व परमेश्वर जीवाचा उध्दार करणारा आहे.
।। जय श्री चक्रधर स्वामी ।।
〰〰〰〰〰〰〰〰〰
श्री मु. ग. महामुनी
No comments:
Post a Comment