Sunday, September 30, 2018


प्राणी पशू  आणि  पक्षी


      ईश्वर अवताराच्या सुखदर्शनाने , अवलोकनाने, संभाषण अथवा स्पर्शसंबंधाव्दारे मनुष्य अथवा  पशु पक्षी इत्यादीच्या शरीरातील जीवाचे कल्यान करण्यासाठी क्षमता फक्त इश्वरी अवताराच्याच ठिकाणी असते. त्या शक्तीमुळे पशू पक्षी इ. योनीत जन्मलेल्या जीवाची त्या शरीरापासून सुटका होवून त्या जीवास इश्वरी सुख फळ प्राप्त होते. मात्र त्या जीवाने पुर्व जन्मी इश्वरी कणव जोडलेली असली पाहिजे. यासबंधीची उदाहरणे आपण  लीळाचरीत्रात अनेक ठिकाणी वाचलेली आहेत. उदा. सालबर्डीचा ससा, आउसामुळे स्वामींचे सानिध्य लाभलेला डांगरेश कुत्रा. याशिवाय आणखी पुढे काही उदाहरणे देत आहे.

()  नवगावचा सर्प :-
     एके दिवशी स्वामी आसनावर विराजमान होते. तेवढ्यात स्वामीचे लक्ष एक सर्प स्वामीच्या दर्शनास येत असलेला होता त्याच्यकडे गेले. तेव्हा स्वामी भक्तजनाना म्हणले, " बाजूला व्हा हो ! आमचा एक भक्त आमच्या दर्नाला येत आहे."
    त्यावेळीसर्व भक्तजन भराभर उठून बाजूला झाले.
मगतो सर्प आला. त्याने तिन वेळा फना उभारून स्वामीना नमस्कार केला. नंतर देहाचे वेटोळे घातले आणि तात्काळ देहत्याग केला. भक्तजनानी नंतर त्ला उचलून बाहेर टाकले.
       या सर्पाच्या देहात जन्मलेला जीव पुर्वी विपरित प्रमादी झाला असला तरी त्याने अत्यंतिक कणव उरविलेली होती. पुर्वी त्या सर्पाने कठोर बोलून ज्ञानियाला दुखावलेले होते. म्हणून मायेने त्याला सर्पाच्या
देहात जन्माला घातलेले होते. परंतु त्याने जोडून ठेवलेल्या कणवेमुळे स्वामीना त्याची कणव आली म्हणून त्या देहातून काडून त्याला लीळादानाने चैतन्यफळाच्या फळाला पाठविले होते.


    परमेश्वर उध्दरीता 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰
  जीव सर्वाधिकारी असल्यामुळे तो कोणतेही कर्म अन्यथाज्ञानामुळे तसेच जसजसा संग सांगात मिळेल
त्यानुसार कर्म करुन अयोग्यता जोडून घेत असतो.
   
     त्यातच मतीत्रय संपन्न प्रकृती असल्यामुळे तर जीव नेहमी पापरुप कर्मेच जास्त जोडून घेत असतो. ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते.                           

    तसेच जीवाला असे करण्यास चेष्टवित असलेले
सलग्न चेष्टविण्याचे काम करुन गमंत पहात बसलेले असते.

    व या सर्व गोष्टीचा फायदा आपोआपच देवता उठवितात व आपली फळे देतात

      अशा प्रकारे प्रपंच्याचा जीवाबरोबर चाललेला खेळ असून तो खेळ नाशिवंत व व्यभिचारी असल्याचे  देवता जीवाला ज्ञान होवू  देत नाहीत .

     परंतु जीव अर्जक असल्यामुळे सर्वज्ञ श्री चक्रधर  स्वामी आपल्या निरुपनात विचार प्रकरण मध्ये म्हणतात की ,

    " जीव पाप पुण्य रुप कर्मे जोडणारा आहे . देवता त्या त्या क्रियेची फळदाती आहे.
व परमेश्वर जीवाचा उध्दार करणारा आहे.

       ।। जय श्री चक्रधर स्वामी ।।

〰〰〰〰〰〰〰〰〰
    श्री मु. ग. महामुनी

पहिले कृष्ण -श्री कृष्ण महाराज

दुसरे कृष्ण - श्री दत्तात्रेय प्रभू महाराज

तिसरे कृष्ण - श्री चक्रपाणी महाराज




चौथे कृष्ण -श्री गोविंदप्रभू महाराज 

Saturday, September 29, 2018

Friday, September 28, 2018

महानुभाव पंचकृष्ण

पहिले कृष्ण -श्री कृष्ण महाराज
दुसरे कृष्ण - श्री दत्तात्रेय प्रभू महाराज
तिसरे कृष्ण - श्री चक्रपाणी महाराज
चौथे कृष्ण -श्री गोविंदप्रभू महाराज