Pages

Sunday, September 30, 2018


प्राणी पशू  आणि  पक्षी


      ईश्वर अवताराच्या सुखदर्शनाने , अवलोकनाने, संभाषण अथवा स्पर्शसंबंधाव्दारे मनुष्य अथवा  पशु पक्षी इत्यादीच्या शरीरातील जीवाचे कल्यान करण्यासाठी क्षमता फक्त इश्वरी अवताराच्याच ठिकाणी असते. त्या शक्तीमुळे पशू पक्षी इ. योनीत जन्मलेल्या जीवाची त्या शरीरापासून सुटका होवून त्या जीवास इश्वरी सुख फळ प्राप्त होते. मात्र त्या जीवाने पुर्व जन्मी इश्वरी कणव जोडलेली असली पाहिजे. यासबंधीची उदाहरणे आपण  लीळाचरीत्रात अनेक ठिकाणी वाचलेली आहेत. उदा. सालबर्डीचा ससा, आउसामुळे स्वामींचे सानिध्य लाभलेला डांगरेश कुत्रा. याशिवाय आणखी पुढे काही उदाहरणे देत आहे.

()  नवगावचा सर्प :-
     एके दिवशी स्वामी आसनावर विराजमान होते. तेवढ्यात स्वामीचे लक्ष एक सर्प स्वामीच्या दर्शनास येत असलेला होता त्याच्यकडे गेले. तेव्हा स्वामी भक्तजनाना म्हणले, " बाजूला व्हा हो ! आमचा एक भक्त आमच्या दर्नाला येत आहे."
    त्यावेळीसर्व भक्तजन भराभर उठून बाजूला झाले.
मगतो सर्प आला. त्याने तिन वेळा फना उभारून स्वामीना नमस्कार केला. नंतर देहाचे वेटोळे घातले आणि तात्काळ देहत्याग केला. भक्तजनानी नंतर त्ला उचलून बाहेर टाकले.
       या सर्पाच्या देहात जन्मलेला जीव पुर्वी विपरित प्रमादी झाला असला तरी त्याने अत्यंतिक कणव उरविलेली होती. पुर्वी त्या सर्पाने कठोर बोलून ज्ञानियाला दुखावलेले होते. म्हणून मायेने त्याला सर्पाच्या
देहात जन्माला घातलेले होते. परंतु त्याने जोडून ठेवलेल्या कणवेमुळे स्वामीना त्याची कणव आली म्हणून त्या देहातून काडून त्याला लीळादानाने चैतन्यफळाच्या फळाला पाठविले होते.

   -श्री मुरलीधर ग. महामुनी 

No comments:

Post a Comment