Pages

Tuesday, October 2, 2018


-: तुरंगमारोहणीं देमतीप्रति श्रीकृष्णलिळाकथन :-


गोसावियानी एक दिवस सावळेद्वारासी बिजे केले. आदल्या दिवशी बाइसानीं मार्कंडाला म्हटले "भास्करा तु पुढे जा, तेथे दायनायकाला सांगावे कि बाबा येत आहेत. सर्व व्यवस्था करावी. घोडा घेउन बाबांना सामोरे यावे". हो का म्हणून मार्कंडाने पुढे जाऊन बाईसांचे भाचे दायनायक यांना निरोप दिला. मग त्यांनी सर्व आइति केली.सडासंमार्जान केले, चौक रंगमाळिका भरल्या, दारात गुढया उभारल्या, मग अश्व घेउन स्वामिंना सामोरे गेले. रस्त्यात स्वामींचे दर्शन झाले. गोसावियानां दंडवते घातली श्रीचरणा लागले आणि स्वामींना घोडयावर बसण्याची विनंती केली. स्वामीं विनंती स्विकारुन घोडयावर बसले.पुढे भक्तगन होते. पाठीमागे स्वामी. स्वामिंनी मागे पाहिले असता त्याना देमती येताना दिसली स्वामीं म्हणाले या देमती, श्रीकरांनी खुण करुन घोडयावर बसण्यास सांगितले. घोडे क्रुश होते स्वामींचे सुचवणे पाहुन  देमतीने घोडयाच्या पाठीवर हात ठेवून स्वामींना म्हणाली "झाले नव्हे का जी."  यावर स्वामी म्हणाले "देमती श्रीकृष्णचक्रवर्ती कुब्जिकेच्या भुवनी गेले सोबत उध्दवदेव होते त्यानां दोन आसने बसायला टाकली श्रीकृष्णचक्रवार्ती म्हणाले "बसा उध्दवदेव" तेव्हा उध्दवदेव खाली बसले आणि आसनावर हात ठेवला. उध्दवदेवांनी जसा आपला सेवकभाव जाणवून दिला तसेच तुम्ही केले तसाच सेवकभाव तुम्हीही जाणवून दिला आमच्या प्रव्रुत्तीला तुम्ही कारण झालात व त्यांच्या प्रव्रुत्तीला उध्दवदेव कारण झाले.यावर बाईसांनी विचारले "श्रीकृष्णचक्रवर्ती व उध्दवदेव यांना समानपणे आठवतो ते का बाबा? अणुभरही उणेपणा नाही." यावर स्वामी म्हणाले "भक्ताची थोरवी देवच जाणो."

-सुदर्शन दिक्षित